Join us

आरटीईच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आणखी एक संधी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 7:32 AM

Right To Education: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता तिसरी फेरी राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

 मुंबई - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता तिसरी फेरी राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्याप ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी सुरुवातीला दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यानंतर प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याला आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

 

टॅग्स :शिक्षण हक्क कायदाविद्यार्थी