शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:13 PM2020-05-16T21:13:40+5:302020-05-16T21:13:54+5:30

२३ मे पर्यंत शुल्क भरून अर्ज पूर्ण करता येणार

Another chance for students who have not paid their fees to sit for the CET exam | शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी

Next

मुंबई - एमएचटी सीईटीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी केली होती. मात्र मुदत संपल्याने अर्ज भरले मात्र पैसे भरले नाहीत अशा अशा विद्यार्थ्यांना आता पुन्हा संधी सीईटी सेलने दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांना २३ मे पर्यंत भरता रक्कम भरून आपला रज निश्चित करता येऊन परीक्षा देता येईल अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. यामुळे तब्ब्ल सात हजार विद्यार्थ्यांना शुल्क भरून परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी मिळणार आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्यातील इतर परीक्षांसह सीईटी परीक्षेला ही बसला आहे.  त्यामुळे सीईटी सेलकडून अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी एमएचट‍ि सीईटीही पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनाकडून होत होती. ज्या विद्यार्थ्यांनी ७ मार्च पर्यंत अर्ज अपुरे स्थितीत भरले होते. अशा ६ हजार ४१८ विद्यार्थ्यांना आता अर्ज पूर्ण भरुन शुल्क भरण्याची संधी येत्या २३ मे पर्यंत असणार आहे.

सीईटीच्या परीक्षेबाबत निर्णय लवकरच

परीक्षांच्या नियोजनासाठी जी समिती नेमली होती त्याच समितीवर सीईटीबाबत निर्णय घेण्याची आणि त्याच्या नियोजनाची जबाबदरी सोपविण्यात आली असून या समितीकडून परीक्षांचं वेळापत्रकाचा बाबतीत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी या आधीच दिली आहे. सीईटीबाबत निर्णय घेताना ती रद्द करण्याचा विचार करून त्यावरही चर्चा झाली मात्र त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते अशी माहिती त्यांनी सीईटी रद्द करा या विद्यार्थ्यांच्या मागणीला देताना दिली होती. यामध्ये यंदा सीईटी परीक्षा जिल्हास्तरावर घेण्याऐवजी तालुकास्तरावर घेण्याचे नियोजन होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: Another chance for students who have not paid their fees to sit for the CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.