मुंबई :
मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांत पुन्हा बदल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १० चा नंबर बदलून त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए केले आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक १० ए चा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलून त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक १० असे करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला असून, हे बदल बुधवारपासून लागू केले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
फलाट क्र. ९ ए लोकलसाठीचमध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील पूर्वीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि आताच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए वर पूर्वी मेल-एक्स्प्रेस आणि लोकल थांबत होत्या. परंतु, आता फक्त लोकल गाड्या थांबणार आहेत.नव्याने बदल केल्याप्रमाणे सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर २२ डब्यांची एक्स्प्रेस उभी करण्यास पुरेशी जागा उपलब्ध असल्याने हा प्लॅटफॉर्म आता फक्त मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी असणार आहे.
दादर स्थानकातील सुधारित प्लॅटफॉर्म क्रमांक पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक १० ९ ए १० ए १०