Join us

प्रशासनातील अधिकाऱ्यांची पुन्हा खांदेपालट, सांगलीच्या आयुक्तांची बदली; पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 22:31 IST

राज्य सरकारने पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्य सरकारने पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. गेल्या आठवड्यात सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सांगली, पालघर, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

सांगलीतील शुभम गुप्ता महानगरपालिका आयुक्त, सांगली यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर अंजली रमेश संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

या अधिकाऱ्यांच्या बदल्या

१. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: २०१३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

२. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: २०१४) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

३. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: २०१९) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

४. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: २०२०) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

५  झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:२०२२) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रसांगलीनागपूर