मुंबई - वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद ्रकिनाऱ्यावर गुरुवारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. स्थानिकांनी नगरसेवकाला माहिती देऊन मृत डॉल्फिनची माहिती वनविभागाला दिली. डॉल्फिनला तपासासाठी परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी सकाळीही वांद्रे येथील चिंबई बीचवर मृत डॉल्फिन आढळून आला होता. गुरुवारी मृत डॉल्फिन आढळून आल्याची माहिती सकाळी १० वाजता मिळाली. तो सहा फुटांचा होता. त्याला परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समजेल. मागे तीन मृत डॉल्फिनच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला, त्यात डॉल्फिनला श्वासोच्छ्वास घेण्याची समस्या असल्याने मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले होते, असे पश्चिम मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी सांगितले.
बॅण्डस्टॅण्डला आढळला दुसरा मृत डॉल्फिन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:36 AM