लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनामुळे केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी, रविवारी शहर उपनगरात कोरोनाचा एक बळी गेला होता. शिवाय, गेल्या दीड आठवड्यापासून चाळ व झोपडपट्टीच्या क्षेत्रात एकाही प्रतिबंधित क्षेत्राची नोंद झालेली नाही. शहर उपनगरात दिवसभरात २७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख २० हजार ४८७ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून सध्या २ हजार ७९१ रुग्ण उपचाराधीन आहेत.
शहर उपनगरात मंगळवारी २७० रुग्ण आणि १ मृत्यूची नोंद झाली. आता मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७ लाख ४१ हजार ६६१ असून मृतांचा आकडा १५ हजार ९५२ आहे. दिवसभरात २८,७४० चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८९ लाख ७६ हजार ७२ कोरोना चाचण्या केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. १७ ते २३ ऑगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०४ टक्के असल्याची नोंद आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ९५८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.
राज्यात दैनंदिन रुग्णांमधील घट कायमराज्यात मंगळवारी ४ हजार ३३५ रुग्ण आणि ११९ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ४ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ४९ हजार ७५२ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ३ लाख १ हजार ९५५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २ हजार ३३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख जणांना लसnमुंबई : राज्यात आतापर्यंत एकूण ५ कोटी ३९ लाख ६ हजार ३५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर सोमवारी ७ लाख ९४ हजार २७ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.nराज्यात १२ लाख ९२ हजार १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ७२ हजार ७०४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.