मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या तब्बल पाच लाखांपेक्षा जास्तीवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत असून गेल्या तीन दिवसांत 15 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील काही बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, या नेत्यांनी कोरोनावर मात देऊन घरं गाठले आहे. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून राज ठाकरेंच्या घरातील आणखी एक ड्रायव्हर कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांचा आकडा 80 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज'मध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. राज ठाकरेंच्या दोन वाहनचालकांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता आणखी एक ड्रायव्हर कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या तीनही ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. यापूर्वी दाखल झालेल्या दोन्ही ड्रायव्हरची प्रकृती सध्या स्थीर आहे. मात्र, राज ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळलं आहे. राज यांच्या घरात काम करणारे कर्मचारीदेखील विशेष काळजी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. ते कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दरम्यान, 22 जूनपासून मुंबईतील शिवसेना भवनही बंद ठेवण्यात आले आहे. शिवसेना भवनातील काही शिवसैनिकांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी
'सलमान खानकडून सुशांतला देण्यात येत होत्या धमक्या'
तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ
इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक