Join us

'वंचित बहुजन आघाडी'ची दुसरी यादी जाहीर, 133 उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:45 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर केली

विधानसभेसाठी साथ सोडणाऱ्या एमआयएमवर प्रकाश आंबेडकरांच्यावंचित बहुजन आघाडीने कुरघोडी केली आहे. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केले होते. त्यानंतर वंचितने दुसरी यादी जाहीर केली असून एकूण 133 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर केली. तसेच, उद्या संध्याकाळपर्यंत 288 उमेदवारांची तिसरी यादी जाहीरो होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमने वंचितसोबत युती तोडत वेगळी चूल मांडली होती. त्यानंतर एमआयएमने दोन याद्या जाहीर केल्या होत्या. मात्र, तरीही वंचित आघाडीसाठी प्रतिक्षेत होती. मात्र, आज प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचितची दुसरी यादीही जातीचा उल्लेख करत जाहीर केली. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या युतीची अपेक्षा धुसर झाली आहे. मात्र, शेवटच्या यादीपर्यंत काहीही होऊ शकते, असे दिसून येते.  

कर्जत जामखेडमधून अरुण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जळगावमधून शेख शफीअब्दुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुऱ्हाडे यासह 22 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यातील जागांचाही समावेश आहे.

 

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीप्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणूक 2019राजकारण