आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र; मान्सून एक्सप्रेस वेगाने पुढे सरकरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:39 PM2020-06-06T17:39:10+5:302020-06-06T17:39:44+5:30

बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर मान्सून पूर्व दिशेने आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Another low pressure area; Monsoon Express will move fast | आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र; मान्सून एक्सप्रेस वेगाने पुढे सरकरणार

आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र; मान्सून एक्सप्रेस वेगाने पुढे सरकरणार

Next


मुंबई : बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहेत. आणि हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर मान्सून पूर्व दिशेने आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मान्सूनची उत्तरी सीमा पूर्व दिशेला पुढे सरकली आहे. आता मान्सून तामिळनाडूतून पुढे सरकत पाँडेचरी आणि सेलमपर्यंत दाखल झाला आहे. चेन्नई अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वोत्तर भारत देखील मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये सर्वसाधारणरित्या ५ जून रोजी मान्सून दाखल होतो. दुसरीकडे महाराष्ट्रदेखील मान्सूनच्या प्रतीक्षेत असून, ८ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून, आता तो गोव्याच्या वेशीवर आहे.

येत्या ४८ तासांत म्हणजे ८ जून रोजी बंगालच्या खाडीत मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल. परिणामी आंध्रप्रदेश, ओरिसाच्या किनारी ९ जून रोजी पावसाळी घडामोडी वेगाने घडतील. १० जून रोजी यात आणखी वेगाने बदल होतील. १० जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा लगत दाखल होईल. या कारणात्सव आंधप्रदेश, तेलंगणा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी पाऊस पडेल. ९ जून रोजी आंध्रप्रदेश येथे पावसाला सुरुवात होईल. आणि ११ ते १५ जून या काळात मध्य भारतात अनेक ठिकाणी व्यापक स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मान्सून मुंबईसमवेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशला पार करत ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशात देखील धडक देईल. शक्यता आहे की १५ जूनच्या आसपास दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्वोत्तर भारताला ओलांडत बिहार आणि झारखंडमध्ये दाखल होईल.

Web Title: Another low pressure area; Monsoon Express will move fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.