Join us

रस्ते घोटाळ्यात आणखी अधिकारी

By admin | Published: September 15, 2016 3:28 AM

रस्ते घोटाळ्याची दुसऱ्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे. यात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे जाहीर होणार असून काही

मुंबई : रस्ते घोटाळ्याची दुसऱ्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून याचा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे. यात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे जाहीर होणार असून काही घोटाळेबाज ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबरच ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहेत.रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी चौकशी आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या चौकशी समितीने पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांची चौकशी करून अहवाल सदर केला. या अहवालातून अनेक गौप्यस्फोट झाले. या समितीने आतापर्यंत २०८ रस्त्यांची पाहणी केली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत सहा ठेकेदार, पालिकेचे दोन प्रमुख अभियंता, थर्ड पार्टी आॅडिट कंपनीचे अभियंत्यांवर कारवाई झाली आहे.दुसऱ्या टप्यात १७४ रस्त्यांची पाहणी करण्यात आली असून दहा ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. पाहणी केलेल्या रस्त्यांमध्ये ३० ते ७० टक्यांपर्यंत अनियमितता आढळून आली आहे. पहिल्या टप्प्यातील चौकशीत प्रमुख अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता, मात्र या घोटाळ्यात प्रमुखच नव्हे, तर दुय्यम अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत सर्वांवर ठपका ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)