शिवसेनेचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, रात्रीतच तब्बल 8 तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:48 AM2021-12-22T09:48:17+5:302021-12-22T09:48:57+5:30

किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत.

Another Shiv Sena leader interrogated by ED for 8 hours in mumbai office | शिवसेनेचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, रात्रीतच तब्बल 8 तास चौकशी

शिवसेनेचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, रात्रीतच तब्बल 8 तास चौकशी

Next
ठळक मुद्देडीकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांची मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आता रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत. 

किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणातील चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, हे अद्याप सांगण्यात आले नाही. तर, वायकर यांनीही ईडीच्या चौकशीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

दरम्यान, ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांची मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आता रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात येत आहे. रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. तसेच, शहरातील विविध संघटनांच्या पदांवरही ते आहेत. त्यामुळे, रविंद्र वायकर यांच्या ईडी चौकशीची चांगलीच चर्चा होत आहे. 
 

Web Title: Another Shiv Sena leader interrogated by ED for 8 hours in mumbai office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.