मानवी तस्करीप्रकरणी आणखी एक अटकेत

By Admin | Published: April 29, 2017 02:06 AM2017-04-29T02:06:54+5:302017-04-29T02:06:54+5:30

पंजाबमधील अल्पवयीन मुलांची विदेशात तस्करी करणाऱ्या टोळीसाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या अस्लम रफीक पांचाळ

Another suspect in human trafficking case | मानवी तस्करीप्रकरणी आणखी एक अटकेत

मानवी तस्करीप्रकरणी आणखी एक अटकेत

googlenewsNext

मुंबई : पंजाबमधील अल्पवयीन मुलांची विदेशात तस्करी करणाऱ्या टोळीसाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या अस्लम रफीक पांचाळ याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो दक्षिण मुंबईतील रहिवासी असून त्याचे मुंबईत तीन ते चार घरे आहेत.
पंजाबच्या अमृतसर भागातल्या अल्पवयीन मुलांच्या तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर सुरुवातीला या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
त्यापाठोपाठ सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) या दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. यांची चौकशी सुरु असतानाच जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाने याप्रकरणात दक्षिण मुंबईतील पांचाळला अटक करण्यात आली आहे. पांचाळचे मुंबईत तीन ते चार घरे आहेत.
तो आरिफच्या सांगण्यावरुन काम करत असे. तसेच एका मुलामागे त्यांना १ ते २ लाख रुपये मिळत होते. यापूवीर्ही पांचाळ याला बोगस पासपोर्ट बनविल्याप्रकरणी गुन्ह्यांत अटक झाली होती. त्याने आतापर्यंत किती मुलांना युरोपात धाडले याचा शोध सुरु आहे.
अल्पवयीन मुलांचे बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि व्हिसा बनवून देण्याची जबाबदारी पांचाळ याच्यावर होती. पांचाळ याच्या अटकेने आरोपींची संख्या सहा झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another suspect in human trafficking case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.