Join us

Crime News: जुळ्या बहिणीच्या लग्नाच्या गोष्टीत आणखी एक ट्विस्ट, आता चौथ्याची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:59 PM

आता, दोन जुळ्या बहिणींच्या वादात तिसऱ्याची एंट्री झाली आहे. तसेच, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुंबई/सोलापूर - मुंबईतील जुळ्या बहिणींशी लग्न करणारा सोलापूरचा तरूण आणखी अडचणीत आला आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिसांना पत्र पाठवले होते. या प्रकाराची त्वरीत चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. आता, दोन जुळ्या बहिणींच्या वादात तिसऱ्याची एंट्री झाली आहे. तसेच, अतुलच्या लगानाबाबतची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

माळेवाडी-अकलूज येथे एकाच वेळी दोन वधूंशी विवाह केल्याप्रकरणी वराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, अकलूज पोलिसांनी १९६०च्या कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे शुक्रवारी अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह करून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. आता, याप्रकरणात नवरदेव अतुल आवताडेच्या पहिल्या बायकोची एंट्री झाली आहे. अतुलचं यापूर्वीच लग्न झालं असून त्याच्या पहिल्या बायकोने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

पोलीस चौकशीत अतुलचं याअगोदरच लग्न झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे, आता मुलीकडच्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. कारण, पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरुन मुलीकडच्या मंडळींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने या लग्नाची चर्चा गावासह पुन्हा सोशल मीडियावरही होत आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षांचे निर्देश

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

अशी झाली ओळख

रिंकी व पिंकी या आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करतात. वडिलांच्या पश्चात त्या आईसोबत राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी दोघी व आईदेखील आजारी पडली. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे त्यांना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली.  

टॅग्स :सोलापूरगुन्हेगारीलग्नपोलिसमुंबई