Join us

सागरीसेतूवरून आणखी एका तरुणाची आत्महत्या

By admin | Published: September 02, 2014 2:26 AM

एका तरुणाने आपले आयुष्य संपविले. विक्रम वासुदेव (45) असे या तरुणाचे नाव असून, पहाटे सहाच्या सुमारास त्याने सेतूवरून आत्महत्या केली.

मुंबई  : आत्महत्यांसाठी हॉट स्पॉट बनलेल्या वांद्रे-वरळी सागरीसेतूवरून उडी मारून आणखी एका तरुणाने आपले आयुष्य संपविले. विक्रम वासुदेव (45) असे या तरुणाचे नाव असून, पहाटे सहाच्या सुमारास त्याने सेतूवरून आत्महत्या केली. या वर्षात सेतूवरून झालेली ही नववी तर गेल्या दोन आठवडय़ांतील चौथी आत्महत्या आहे.
वांद्रे पोलिसांनी विक्रम यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे. पेशाने व्यावसायिक असलेले विक्रम प्रभादेवीच्या गुरुदेव सोसायटीत प}ीसह वास्तव्यास होते. पहाटे सहाच्या सुमारास ते आपल्या वॅगनआर (एमएच क्2 बीएफ 8187) कारमधून सेतूवर आले. सेतूवरील पोल क्रमांक 19 जवळ त्यांनी कार थांबवली. गाडीतून उतरून ते समुद्रात उडी मारण्याच्या तयारीत होते. हा प्रकार पाहून सेतूच्या सुरक्षारक्षकाने आरडाओरडा करीत त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र सुरक्षारक्षक पोहोचेर्पयत उशीर झाला होता. विक्रम यांनी समुद्रात उडी घेतली होती. 
सुरक्षारक्षकाने लागलीच ही बाब पोलिसांना कळवली. त्यानुसार वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वॅगनआर कारमधील कागदपत्रंवरून विक्रम यांची ओळख पटवली. त्यांचे घर शोधून काढून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. प्लेसमेन्ट एजन्सी चालविणा:या विक्रम यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाला ब्रेन टय़ुमर होता. 2क्क्9मध्ये त्याच्या मृत्यूनंतर विक्रम यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातही आर्थिक संकटे येत होती, अशी माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली आहे. (प्रतिनिधी)