शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहचणार पोस्टाने ....!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:57 PM2020-05-13T17:57:12+5:302020-05-13T17:57:43+5:30

मात्र विशेष पासेसची व्यवस्था न झाल्याने शिक्षकांचा पेपर कलेक्शनसाठी विरोध

Answer sheets will reach schools by post ....! | शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहचणार पोस्टाने ....!

शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहचणार पोस्टाने ....!

Next


मुंबई : दहावी व बारावी उत्तरपत्रिका तपासणीसाठी लॉकडाऊन मधील संचारबंदीमध्ये शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचे पत्र उच्च व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व जिल्ह्यातील आयुक्त, पोलीस अधीक्षक , कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. त्यानंतर आता शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयनमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी पोहचाव्यात यासाठी मंडळाकडून पोस्टाची मदत घेण्यात आहे. यासाठी मुंबई विभागीय मंडळाकडून कार्यवाही सुरु झाली असून त्यासंबंधित विनंती पत्र ही मंडळाने पोस्टाला दिले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या औषधांची ने आन करणे पोस्टाची प्राथमिकता आहे. मात्र मंडळाची विनती मान्य करून पोस्टाकडून उत्तरपत्रिका ने आन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या सबंधित कार्यवाही ही सुरु झाली असून २१ मार्च रोजी झालेल्या दहावीच्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका पोस्टाने जिल्ह्यातील सबंधित विभागात पाठविण्यात आल्याची माहिती संगवे यांनी दिली. या उत्तरपत्रिका सबंधित शाळांनी स्वीकारून परीक्षकापर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही विभागीय मंडळामार्फत दिल्या गेल्या आहेत. या उत्तरपत्रिका पोस्टात परत जाणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी असे आवाहनही मुख्याध्यापकांना करण्यात आले आहे. पासेससाठी या आधीच जिल्हा महानगरपालिका आयुक्त, पोलीस नियंत्रण कक्ष याना पत्र देण्यात आल्याची माहितीही संगवे यांनी दिली.

मात्र शिक्षकांनी अद्याप पासेसची प्रक्रिया होऊन पास न मिळाल्याने या आवाहनाला विरोध दर्शविला आहे. अत्यावश्यक सेवेतील पासेसचे वाटप झाले मत्र शिक्षकांना पासेस मिळाले नाहीत ते अत्यावश्यक सेवेत येत नाहीत का ? असा सवाल काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे. अजूनही परीक्षकांना  नियमकांकडे पेपर जमा करण्यासाठी पासेस मिळाले नाही त्यात आता इतिहासाचे पेपर मुख्याध्यापक हे शिक्षकांपर्यंत कसे पोहचवतील ?  पनवेल मध्ये राहणाऱ्या मुख्याध्यापकाला मुंबईतील आपल्या शाळेतून पेपर घेऊन वसईत किंवा कल्याण ला राहणाऱ्या शिक्षकांपर्यंत पेपर कसे पोहचवेत हा प्रश्न निर्माण होईल. हे सगळे विभाग रेडझोन आहे. यावर बोर्डाने आताच घाई न करता लॉकडाउन शिथिल झाल्यावर मार्ग काढावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी दिली.


 

Web Title: Answer sheets will reach schools by post ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.