Join us

शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहोचणार पोस्टाने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:26 AM

मुंबई : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी लॉकडाउनमधील संचारबंदीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचे पत्र उच्च व उच्च ...

मुंबई : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी लॉकडाउनमधील संचारबंदीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचे पत्र उच्च व उच्च माध्यमिक मंडळाने सर्व जिल्ह्यांतील आयुक्त, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर आता शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी पोहोचाव्यात यासाठी मंडळाकडून पोस्टाची मदत घेण्यात आली आहे. यासाठी मुंबई विभागीय मंडळाकडून कार्यवाही सुरू झाली असून त्यासंबंधित विनंती पत्रही मंडळाने पोस्टाला दिल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या औषधांची ने-आण करणे, ही पोस्टाची प्राथमिकता आहे. मात्र, मंडळाची विनंती मान्य करून पोस्टाकडून उत्तरपत्रिका ने-आण करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, २१ मार्च रोजी झालेल्या दहावीच्या इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिका पोस्टाने जिल्ह्यातील संबंधित विभागात पाठविल्याची माहिती संगवे यांनी दिली. या उत्तरपत्रिका संबंधित शाळांनी स्वीकारून परीक्षकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही विभागीय मंडळाने दिल्या आहेत.या उत्तरपत्रिका पोस्टात परत जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्याध्यापकांना करण्यात आले आहे. पासेससाठी या आधीच जिल्हा महानगरपालिका आयुक्त, पोलीस नियंत्रण कक्ष यांना पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विशेष पासेसची व्यवस्था करण्याची मागणी अत्यावश्यक सेवेसाठीचे पास अद्याप न मिळाल्याने शिक्षकांनी शाळेतून पेपर घेऊन येण्यास विरोध केला आहे. अजूनही परीक्षकांना नियमकांकडे पेपर जमा करण्यासाठी पासेस मिळालेले नाहीत. इतिहासाचे पेपर मुख्याध्यापक हे शिक्षकांपर्यंत कसे पोहोचवतील? पनवेलमध्ये राहणाºया मुख्याध्यापकांपुढे मुंबईतील आपल्या शाळेतून पेपर घेऊन वसईत किंवा कल्याणला राहणाºया शिक्षकांपर्यंत पेपर कसे पोहोचवावेत हा प्रश्न निर्माण होईल. हे सर्व विभाग रेडझोन आहे. यावर बोर्डाने आताच घाई न करता लॉकडाउन शिथिल झाल्यावर मार्ग काढावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी दिली.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रमहाराष्ट्र