अँटालिया स्फोटके प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:09 AM2021-09-09T04:09:53+5:302021-09-09T04:09:53+5:30

अहवाल बदलण्यासाठी परमबीर सिंह यांनी पाच लाख रुपये दिल्याचा सायबर सेल तज्ज्ञाचा जबाब एनआयएचा दावा अँटालिया स्फोटके प्रकरण अहवाल ...

Antalya blast case | अँटालिया स्फोटके प्रकरण

अँटालिया स्फोटके प्रकरण

Next

अहवाल बदलण्यासाठी परमबीर सिंह यांनी पाच लाख रुपये दिल्याचा सायबर सेल तज्ज्ञाचा जबाब

एनआयएचा दावा

अँटालिया स्फोटके प्रकरण

अहवाल बदलण्यासाठी परमबीर सिंग यांनी पाच लाख रुपये दिल्याचा सायबर सेल तज्ज्ञाचा जबाब

एनआयएचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’च्या टेलिग्रामवरील पोस्टबाबत अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) सांगितले की, त्याचा अहवाल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाशी संबंधित नाही. त्याला त्या अहवालात सुधारणा करण्याचे आदेश तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते. सुरुवातीला या कामासाठी त्याला तीन लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र त्याने केलेल्या उत्कृष्ट कामावर खूश होऊन सिंग यांनी त्याला पाच लाख रुपये दिले. त्याने दिलेल्या सेवेसाठी तो इतके पैसे मिळवण्यास पात्र आहे, असे सिंग यांनी म्हटले.

एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. त्यात सायबर सेल तज्ज्ञाच्या जबाबाचाही समावेश आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीनने भरलेली एसयूव्ही सापडली तेव्हा दहशतवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरून त्याची जबाबदारी घेतली.

सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला दिलेल्या जबाबानुसार, तो त्याच दिवशी परमबीर सिंग यांना भेटला. जानेवारी २०२१ मध्ये इस्राइल दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याने दिल्ली पोलिसांना मदत केल्याचे सिंह यांना सांगितले. या स्फोटाची जबाबदारी घेणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’ची लिंक दिल्लीमधील तिहार कारागृहाशी संबंधित आहे. पोस्ट टाकण्यासाठी तिहार कारागृहातील मोबाइल वापरण्यात आल्याचे त्याने सिंग यांना सांगितले.

त्यावर सिंग यांनी त्यांच्यासाठी तसा अहवाल लिहिण्यास मला सांगितले आणि त्यांच्या कार्यालयात बसूनच मी अहवाल तयार केला. अहवाल वाचल्यानंतर सिंग यांनी टेलिग्राम चॅनेलवर जैश-उल-हिंदचे आलेले पोस्टर वापरण्यास सांगितले आणि अँटालिया स्फोटकाची जबाबदारीही त्याच संघटनेने दावा केल्याचे नमूद करण्यास सांगितले. त्यानुसार, मी अहवालात सुधारणा केली आणि जैश-उल-हिंदचे नाव टाकून त्यांनी या घटनेची जबाबदारी घेतल्याचे नमूद केले, असे सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला सांगितले.

माझा अहवाल वाचून सिंग यांनी त्यांना मला पैसे द्यायचे असल्याचे सांगितले. मात्र, मी हे काम पैशाच्या उद्देशाने केले नसल्याचे सांगितले. परंतु, मी उत्कृष्ट काम केल्याने त्यांनी त्यांच्या खासगी सचिवाला मला पाच लाख रुपये देण्यास सांगितले, असे सायबर सेल तज्ज्ञाने एनआयएला सांगितले.

----------------------------------------

मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी वाझने प्रदीप शर्माला पैसे दिले : एनआयएचा दावा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने पैसे दिल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

हिरेन कसा दिसतो, हे दाखवण्यासाठी सचिन वाझे याने २ मार्च रोजी हिरेन यांना एका बैठकीत बोलावले. त्या बैठकीत प्रदीप शर्मा, सुनील माने हे उपस्थित होते.

हिरेन यांची हत्या करण्याचे काम प्रदीप शर्मा यांच्यावर सोपवण्यात आले होते. शर्मा यांनी याबाबत संतोष शेलारकडे विचारणा केली आणि त्याने हिरेन यांची हत्या करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वाझे पुन्हा शर्माला भेटला आणि त्याला या हत्येसाठी खूप मोठी रक्कम दिली, असा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

Web Title: Antalya blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.