Join us

अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 06:06 IST

Antilia case latest News: काझीने त्याचा साथीदार आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार उभी केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला पोलिस अधिकारी रियाजुद्दीन काझी याला खटल्यातून दोषमुक्त करण्यात विशेष न्यायालयाने नकार दिला. 

काझीने त्याचा साथीदार आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

वाझेला मदत केली

या प्रकरणात तपास अधिकारी सचिन वाझे असल्याने त्याच्या आदेशाचे आपण पालन केले, असे म्हणत काझी याने आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. 

‘पुरावे गायब करून आरोपीला पाठीशी घालण्याकरिता काझी याने सचिन वाझेच्या सांगण्यावरून डीव्हीडी, सीपीयू इत्यादी गोळा केले. काझी याने आरोपीला यूएपीए कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा करण्यासाठी मदत केली. काझीने पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडल्या,’ असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. ए. एम. पाटील यांनी काझीचा दोषमुक्तततेचा अर्ज फेटाळताना नोंदविले.

टॅग्स :सचिन वाझेन्यायालयमुकेश अंबानीगुन्हेगारीमुंबई पोलीस