कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 07:10 PM2020-04-19T19:10:22+5:302020-04-19T19:10:55+5:30

कोरोना विरोधी लढ्यासाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीने पुढाकार घेतला आहे.

Anti-Corona fight: Chinchpokali Chintamani aids three and a half lakhs for Chief Minister's Assistance Fund | कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत

कोरोना विरोधी लढा : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीची साडेतीन लाखांची मदत

Next

मुंबई : कोरोना विरोधी लढ्यासाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तीन लाख एकावन्न हजार रुपयांची मदत केली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली १०० वर्षे विविध उपक्रम राबवित आहे. सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सांस्कृतिक,कला-क्रीडा या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक  यांनी सांगितले की,आज देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे, हे संकट जगव्यापी व भयावह आहे. अशा प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका धीरोदत्त योध्या प्रमाणे आपले सरकारमधील सहकारी, डॉक्टर्स,नर्सेस,वॉर्ड बॉय,पोलीस, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी या सैनिकांसोबत एका निष्ठेने,संयमाने कोणताही भेदभाव न करता फक्त माणुसकीच्या धर्मासाठी लढत आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  मदतीसाठी आवाहन केले होते. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ व मंडळाचे दानशूर आजी-माजी पदाधिकारी, कार्यकारिणी व सहाय्यक सदस्य,वर्गणीदार,हितचिंतकांमार्फत जमा झालेली तीन लाख एक्कावन्न हजार रूपये 'मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड १९' या निधीसाठी धनादेशाद्वारे संबधित खात्यात जमा करण्यात आले आहे.

 तसेच कोरोना चा फैलाव रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मंडळाच्या वतीने करोना या विषाणूबाबतची माहिती व घ्यावयाची काळजी या संबधीचे माहिती पत्रक सोबत डेटॉल साबण व सॅनिटायझरचे चिंचपोकळी परिसरातील इमारतींमध्ये मार्च महिन्यात घरोघरी करण्यात आले होते.

तसेच २०१९ मध्ये मंडळाने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध करून दिला होता. या भयावह परिस्थितीवर आपण सर्वांच्या मदतीने नक्कीच मात करण्याचा आशावाद मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Anti-Corona fight: Chinchpokali Chintamani aids three and a half lakhs for Chief Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.