समतावादी वातावरणासाठी नशाबंदी मंडळ प्रयत्नशील

By admin | Published: April 16, 2015 12:41 AM2015-04-16T00:41:36+5:302015-04-16T00:41:36+5:30

महाराष्ट्रासह मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताह पार पडला

The Anti-Empowerment Mandal Board strives to try | समतावादी वातावरणासाठी नशाबंदी मंडळ प्रयत्नशील

समतावादी वातावरणासाठी नशाबंदी मंडळ प्रयत्नशील

Next

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताह पार पडला. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ८ ते १४ एप्रिलदरम्यान मुंबई शहर-उपनगरात विविध कार्यक्रम पार पडले. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक समता रथयात्रेने करण्यात आले.
या यात्रेत सहा फुटी संविधानाची प्रतिकृती, संविधानातील विविध माहिती देणाऱ्या कलमांची पोस्टर्स, स्टँडी आणि बॅनर्स यांचा सहभाग होता. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. या सप्ताहादरम्यान, सर जे. जे. रुग्णालयात रक्तदान शिबिरही पार पडले. तर नशाबंदी मंडळातर्फे या विभागात अमली पदार्थांच्या विरोधी प्रचार मोहीम काढण्यात आली.
या सप्ताहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. सप्ताहाच्या अखेरीस गेट वे आॅफ इंडिया येथे सामाजिक कार्यक्षेत्रातील चळवळीतील व्यक्तींनी विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने दिली. यावेळी स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजातील समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The Anti-Empowerment Mandal Board strives to try

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.