Join us

महसूलची अतिक्रमणाविरोधी कारवाई

By admin | Published: November 05, 2014 12:09 AM

चिखले गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या ग्रामस्थावर डहाणू महसुल विभागाने सोमवारी कारवाई केली

बोर्डी : चिखले गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या ग्रामस्थावर डहाणू महसुल विभागाने सोमवारी कारवाई केली. मात्र काही तासांच्या अवधीनंतर पुन्हा बांधकाम करून कायदा जुमानत नसल्याचे प्रत्त्युत्तर दिले. दरम्यान अवैध रेती उपशाप्रमाणे अतिक्रमणाविरोधात डहाणू महसुल विभागाची पकड ढिली होत असल्याची चर्चा जनसामान्यांतुन व्यक्त होत आहे.डहाणू तालुक्यातील चिखले गावात भारतीय तटरक्षक दलाचा प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाच्या प्रवेशद्वारानजीक शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाविरोधी दोन वर्षापुर्वी डहाणू महसुल विभागाने कारवाई केली होती. अतिक्रमण करून घराचे बांधकाम सुरू असल्याचे चिखले महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बच्चुभाई माच्छी, माजी मंडळ अधिकारी यज्ञेश्वर पाटील आणि अन्य ग्रामस्थांनी संबंधीत घटना डहाणू तहसिलदारांच्या निदर्शनास आणली. चिखले तलाठी वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन अनधिकृत बांधकाम थांबविण्याची कारवाई केली. चिखले ग्रामपंचायतीने अतिक्रमणाविरोधी अहवाल महसुल आणि प्रांत विभागाला पाठविण्याचे सरपंच संदेश काटेला यांनी सांगितले. अतिक्रमणाविरोधी कारवाईनंतर काही तासातच पुन:बांधकामाला सुरूवात झाल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे. बोर्डी परिसरातील समुद्रकिनारी दिवसाढवळ्या अवैध रेती उपसा करून कायदा पायदळी तुडवला जात आहे. सदर प्रकरणात पुन: बांधणीद्वारे कायदा जुमानत नसल्याचे प्रतिउत्तर देण्यात आले आहे.