Join us  

सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 5:47 AM

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावकारविरोधी कायद्यात त्रुटी असून, या कायद्याची तीव्रता वाढवावी, अशी मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पलूस येथील सावकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही १४ लाख वसूल केले जात असतील तर ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल, तसेच विद्या चव्हाण समितीच्या शिफारशींचा आढावा घेऊन त्यातील योग्य शिफारशींचा सावकारविरोधी कायद्यात समावेश केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सावकारविरोधी कायद्यात त्रुटी असून, या कायद्याची तीव्रता वाढवावी, त्यासाठी विद्या चव्हाण समितीच्या शिफारशींचा समावेश कायद्यात करावा, अशी मागणी केली. यासंदर्भात उमा खापरे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांंनी उत्तर दिले. ते म्हणाले की, अवैध सावकारीत कोणी अडकले असेल तर त्यांनी तक्रारी दाखल कराव्यात. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :देवेंद्र फडणवीस