पुरातन नाणी, मोडीलिपीचा उलगडला इतिहास

By admin | Published: September 2, 2014 11:40 PM2014-09-02T23:40:54+5:302014-09-02T23:40:54+5:30

वर्गणीची जबरदस्ती, गणोशोत्सव काळात चालणारे जुगार, अन्य विविध कारणामुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे व त्यांच्याकडे पहाण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन कलुषीत होत गेला.

Antique coins, Modalipa history | पुरातन नाणी, मोडीलिपीचा उलगडला इतिहास

पुरातन नाणी, मोडीलिपीचा उलगडला इतिहास

Next
नायगांव  : वर्गणीची जबरदस्ती, गणोशोत्सव काळात चालणारे जुगार, अन्य विविध कारणामुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे व त्यांच्याकडे पहाण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन कलुषीत होत गेला. ज्या प्रयोजनाकरीता हे उत्सव सुरू झाले ते प्रयोजकच लयास गेल्याने सार्वजनिक गणोश उत्सवाचा ज्ञान व सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याचा छोटासा प्रय} नालासोपा:या नजिक एका सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने केला.
मोडी लिपीतील कागदपत्रे व पुरातन ऐतिहासिक नाणी यांची माहिती प्रदर्शन व मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  7 च्या शतकापासुन ब्रिटीश राजवटीर्पयतच्या कालखंडातील ऐतिहासिक नाणी हाताळण्याची संधी उपस्थितांना मिळाली. नाणी संग्राहक पास्कल लोपीस यांनी महत्वपुर्ण मार्गदर्शन उपस्थितांना केले. शिलाहार राजाच्या काळापासून ते स्वतंत्र भारतातील नाणी व त्यात होत गेलेले बदल यावेळी उपस्थितांना माहिती स्वरूपात मिळाली.
सोपारा साष्टी प्रांतातली नाणीही या प्रदर्शनात उपलब्ध होती. मोडी अभ्यासक  o्रेयस जोशी यांनी यावेळी मोडी लीपीची तोंडओळख करून देत छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे कालीन पत्र सादर केली. मोडी शिकण्यासाठी हल्ली परदेशात अनेकजण प्रय}शील असताना भारतात याबाबत उदासीनता असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हेमाडपंत यांनी यादवरावांच्या कालखंडात मोडीचा उदय झाला. 1क् च्या शतकापासून आद्यकाल 12 व्या शतकार्पयत ही भाषा वापरण्यात आली. पुढे शिवकालात व पेशवेकाळात अमुलाग्र बदल झाल्याची माहिती त्यांनी दिली. ऐतिहासिक नाणी आणि मोडीलिपी यांचा मोठा पटच या कार्यक्रमात उलगडण्यात आला. इतिहासप्रेमींना ही पर्वणी ठरली. (वार्ताहर)

 

Web Title: Antique coins, Modalipa history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.