चिंता वाढली! राज्यात दिवसभरात ८ हजार ८०७ रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:07 AM2021-02-25T04:07:42+5:302021-02-25T04:07:42+5:30

८० मृत्यू : आतापर्यंत २० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी ८ हजार ८०७ ...

Anxiety increased! 8 thousand 807 patients in a day in the state | चिंता वाढली! राज्यात दिवसभरात ८ हजार ८०७ रुग्णवाढ

चिंता वाढली! राज्यात दिवसभरात ८ हजार ८०७ रुग्णवाढ

Next

८० मृत्यू : आतापर्यंत २० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी ८ हजार ८०७ रुग्णांचे निदान झाले असून, ८० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २१ लाख २१ हजार ११९ झाली असून, मृतांचा आकडा ५१ हजार ९३७ झाला आहे, तर दिवसभरात २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील दीड आठवड्यापासून राज्यासह मुंबईत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के असून, मृत्युदर २.४५ टक्के आहे. सध्या ५९ हजार ३५८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, २ हजार ४४६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दैनंदिन रुग्णांत वाढ

२४ फेब्रुवारी – ८ हजार ८०७

२३ फेब्रुवारी – ६ हजार २१८

२२ फेब्रुवारी – ५ हजार २१०

२१ फेब्रुवारी – ६ हजार ९७१

उपचाराधीन रुग्णांचा आलेखही चढाच

२४ फेब्रुवारी – ५९ हजार ३५८

२३ फेब्रुवारी – ५३ हजार ४०९

२२ फेब्रुवारी – ५३ हजार ११३

२१ फेब्रुवारी – ५२ हजार ९५६

Web Title: Anxiety increased! 8 thousand 807 patients in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.