चिंता वाढली! मुंबईची प्रकृती खालावतेय, हवा खराब होतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:56 AM2020-11-04T05:56:49+5:302020-11-04T05:57:13+5:30

mumbai weather : मालाड येथील हवा अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. चेंबूर येथील हवाही अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. बीकेसीमध्येही खराब हवेची नोंद झाली आहे.

Anxiety increased! Mumbai's health is deteriorating, the air is getting worse | चिंता वाढली! मुंबईची प्रकृती खालावतेय, हवा खराब होतेय

चिंता वाढली! मुंबईची प्रकृती खालावतेय, हवा खराब होतेय

Next

मुंबई : मान्सून उलटून आता मुंबईला थंडीची चाहूल लागली आहे. एव्हाना किमान तापमानात घसरणही नोंदविण्यात येत आहे. मात्र थंडीची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे मुंबईच्या प्रदूषणातही भर पडली आहे. नवी मुंबई येथील हवा खराब नोंदविण्यात आली आहे. 
मालाड येथील हवा अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. चेंबूर येथील हवाही अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. बीकेसीमध्येही खराब हवेची नोंद झाली आहे. कुलाबा येथेही खराब हवा असून, संपूर्ण मुंबईच्या हवेची नोंद खराब नोंदविण्यात आली आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील प्रदूषण घटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊन शिथिल होत असतानाच आता पुन्हा प्रदूषणात वाढ नोंदविण्यात येत आहे. 
हवेची गुणवत्ता ६० इतकी म्हणजेच हवेतील पीएम २.५चे प्रमाण ६० मायक्रो ग्राम पर मीटर क्यूबपेक्षा कमी असावे लागेल किंवा लागते. मात्र ते त्यापेक्षा जास्त आहे. मुंबई महानगर प्रदेशात अधिकाधिक प्रदूषण होते आहे आणि हे काही आता होत नाही. 
गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या आहेत. केवळ भारत आणि महाराष्ट्र नाही तर मुंबई आणि परिसरातील नागरिकांचे आयुष्यही वायुप्रदूषणामुळे पाच वर्षांनी घटले आहे.  
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील प्राधिकरणे, महापालिका यांनी येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे सांगण्यासाठी कोणत्या अहवालाची गरज नाही. 
सरकार नावाच्या यंत्रणेने काम केले पाहिजे. सरकारला याचे गांभीर्य राहिलेले नाही, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Anxiety increased! Mumbai's health is deteriorating, the air is getting worse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई