चिंता कायम ! दिवसभरात कोरोनाचे ६७ हजार १३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:33+5:302021-04-23T04:07:33+5:30

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ६७ हजारांच्या टप्प्यात रुग्णांचे निदान झाले असून, दैनंदिन मृत्यूही सर्वाधिक झाले आहेत. राज्यात ...

Anxiety persists! 67 thousand 13 patients of corona during the day | चिंता कायम ! दिवसभरात कोरोनाचे ६७ हजार १३ रुग्ण

चिंता कायम ! दिवसभरात कोरोनाचे ६७ हजार १३ रुग्ण

Next

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ६७ हजारांच्या टप्प्यात रुग्णांचे निदान झाले असून, दैनंदिन मृत्यूही सर्वाधिक झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा २४ तासांत ५६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४० लाख ९४ हजार ८४० झाली असून, मृतांचा आकडा ६२ हजार ४७९ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ९९ हजार ८५८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के झाले असून, मृत्युदर १.५३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.४५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होमक्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. राज्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात असून, ही संख्या १ लाख १७ हजार ३३७ इतकी आहे. त्याखालोखाल, मुंबईत ८२ हजार ६१६, नागपूरमध्ये ८० हजार ९२४, ठाण्यात ८० हजार ७४३ आणि नाशिकमध्ये ४६ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ५६८ मृत्यूंमध्ये मुंबई ७५, ठाणे मनपा ९, मीरा-भाईंदर मनपा ९, वसई-विरार मनपा ३, रायगड २९, पनवेल मनपा २, नाशिक ११, नाशिक मनपा २०, अहमदनगर १६, अहमदनगर मनपा १४, धुळे २, धुळे मनपा ३, जळगाव १८, जळगाव १, नंदूरबार १, पुणे ४, पुणे मनपा ३, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सोलापूर मनपा १४, सातारा १७, कोल्हापूर ४, कोल्हापूर मनपा ४, सांगली ८, सांगली-मिरज कुपवडा मनपा २, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी १, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ४, जालना ७, हिंगोली १, परभणी १७, परभणी मनपा ६,लातूर १५, लातूर मनपा ५, उस्मानाबाद २४, बीड ११, नांदेड ३४, नांदेड मनपा १३, अकोला ५, अकोला मनपा ७, अमरावती ८, अमरावती मनपा २, यवतमाळ ३७, वाशिम १, नागपूर १८, नागपूर मनपा ५५, वर्धा ९, गोंदिया १, चंद्रपूर ६, गडचिरोली १ आणि अन्य राज्य/देशातील ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Anxiety persists! 67 thousand 13 patients of corona during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.