चिंता वाढतेय ! दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:00+5:302021-03-08T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ११,१४१ नवीन काेराेनाबाधित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ११,१४१ नवीन काेराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २२,१९,७२७ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ४७८ झाला आहे. शनिवारी १०,१८७ बाधितांचे निदान झाले हाेते.
रविवारी दिवसभरात ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के झाले आहे. सध्या ९७,९८३ रुग्ण उपचाराधीन आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. सध्या राज्यातील मृत्युदर २.३६ टक्के आहे. रविवारी दिवसभरातील ३८ मृत्यूंमध्ये मुंबई ४, ठाणे १, नवी मुंबई मनपा २, पनवेल मनपा १, नाशिक १, नाशिक मनपा २, मालेगाव १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव २, पुणे ३, पुणे मनपा २, सोलापूर १, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद मनपा ३, लातूर १, नांदेड १, बीड १, अकोला मनपा १, अमरावती १, अमरावती मनपा २, नागपूर १ आणि अन्य राज्य/ देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइन, तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारण्टाइनमध्ये आहेत.
...................