अरे बापरे! ‘एनी डेस्क’ने केली ३९ लाख रुपयांची ‘काशी’, ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:10 AM2023-07-25T06:10:22+5:302023-07-25T06:11:03+5:30

मुलीला बसला वडिलांसाठी काशीदर्शनाच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा फटका

'Any Desk' fraud of 39 lakh rupees | अरे बापरे! ‘एनी डेस्क’ने केली ३९ लाख रुपयांची ‘काशी’, ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा फटका

अरे बापरे! ‘एनी डेस्क’ने केली ३९ लाख रुपयांची ‘काशी’, ऑनलाइन तिकीट आरक्षणाचा फटका

googlenewsNext

मुंबई : आपल्या वडिलांना देवदर्शनासाठी काशी येथे जायची इच्छा असल्याने मुलीने ऑनलाइन तिकीट आरक्षित केले; मात्र तिकिटाची प्रत न मिळाल्याने तिने संपर्क साधल्यानंतर ठगांनी मोबाइलवर एनी डेस्क ॲप  डाउनलोड करायला सांगून त्याद्वारे मुलीच्या खात्यातून तब्बल ३८ लाख ८३ हजारांवर डल्ला मारला. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास चालू आहे.

सदर तक्रारदार (४७) भांडूपची रहिवासी आहे. वडिलांना काशीला जाता यावे म्हणून मुलीने विमानाचे ऑनलाइन तिकीट बुक केले. १३ मार्चला त्यांनी संबंधित संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर एका व्यक्तीने मुलीला कॉल करून एनी डेस्क हे डाउनलोड करण्यास सांगितले.

एनी डेस्कद्वारे घेतला संगणकाचा ताबा

    एनी डेस्कद्वारे त्याने मुलीच्या मोबाइलचा ताबा घेऊन तिच्या खात्यातून ही रक्कम काढली. तसा संदेश बँकेतून मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच मुलीने त्वरेने बँकेला कळविले.

    मात्र बँकेकडूनही तात्काळ प्रतिसाद न मिळाल्यामुळे काही दिवसाने क्रेडिट कार्डच्या बिलाच्या संदर्भाने फोन येण्यास सुरुवात झाली. 

    अखेर, रविवारी त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

एनी डेस्क म्हणजे काय?

एनी डेस्क ॲप वा सॉफ्टवेअर हे संगणक, लॅपटॉप वा मोबाइलवर डाउनलोड करता येते. त्याद्वारे एखादी व्यक्ती त्या ॲपच्या माध्यमातून दुसऱ्या डिव्हाइसचा म्हणजे संगणक, लॅपटॉप वा मोबाइलचा ताबा घेऊ शकतो. इंटरनेटच्या साहाय्याने हे दोन स्वतंत्र डिव्हाइस संलग्न होऊ शकतात. दुसरी व्यक्ती या ॲपद्वारे तुमच्या डिव्हाइसचा ताबा घेऊ शकते वा नियंत्रण करू शकते.

Web Title: 'Any Desk' fraud of 39 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.