सीमा महांगडे
मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणूक म्हटली की कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांनाच असते. ती शमवण्यासाठी मतदानपूर्व, मतदानोत्तर सर्वेक्षणे केली जातात. काही एजन्सी, वृत्तपत्रे, चॅनेल्स आणि पक्षांतर्फे अशी सर्वेक्षणे जनतेसमोर मांडली जातात. मात्र अनेकदा ती ‘मॅनेज’ केल्याची चर्चा रंगते. त्यामुळेच सामान्य जनतेला स्वत:च सर्वेक्षण करून निवडणुकांचा कौल समजून घेता यावा, यासाठी २४ वर्षीय विशाल मिश्राने अॅप तयार केले आहे. ते वापरून स्वत:च स्वत:ची सर्वेक्षण यंत्रणा उभारता येऊ शकते.
आॅस्ट्रेलियात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विशालने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग डिप्लोमाचा अभ्यास के. जे. सोमय्यामधून पूर्ण केला आहे. सुट्टीच्या काळात तो मूळ घरी कल्याणला राहायला आला असता त्याला अपघात झाला. यादरम्यान त्याला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली. नुसतेच बसून राहण्यापेक्षा हा मोकळावेळ सत्कारणी लावायला हवा, असे विशालला वाटू लागले. सध्या भारतात वाहणारे निवडणुकांचे वारे आणि मतांचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार यावरून रंगणारी चर्चा ऐकल्यानंतर विशालच्या लक्षात आले की, निवडणुकीत कोण जिंकेल याबाबत अनेक सर्वेक्षणे होतात. पण त्यातील अनेक ‘मॅनेज’ केलीजात असल्याचा सूर सर्वसामान्य जनतेत आहे. स्वत: सर्वेक्षण करता आले, तर फारच बरे होईल, असेही अनेकांना वाटते. सर्वसामान्यांचा हा कल लक्षात घेऊनच विशालने त्यांना स्वत: सर्वेक्षण करता येईल, असे एखादे अॅप तयार करायचे ठरविले आणि अथक परिश्रमाअंती आपले कसब पणाला लावत ‘पोलकास्टर’ नावाचे अॅप तयार केले.दोनच आठवड्यांपूर्वी त्याने तयार केलेल्या या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचा वापरही सुरू झाला आहे. त्यावर ३९० हून अधिक प्रश्नही उपस्थित झाल्याची माहिती विशालने दिली.असे करता येईल सर्वेक्षणच्ज्याला सर्वेक्षण करायचे असेल त्याला या अॅपमध्ये निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावली द्यावी लागेल. उदाहरणार्थ कोणत्या पक्षाला किती मते मिळणार, कोण जिंकून येईल असे तुम्हाला वाटते इत्यादी.च्प्रश्नावली अपलोड केल्यानंतर उत्तरे देण्यासाठी ठरावीक वेळ देण्यात येईल.च्ही वेळ संपल्यानंतर आलेल्या उत्तरांची पडताळणी करून सर्वेक्षणाचा निकाल पाहणे शक्य होईल.