Join us

एपीएमसीचे संचालक मंडळ रद्द

By admin | Published: June 27, 2014 1:19 AM

पणन संचालकांनी आज तडकाफडकी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : पणन संचालकांनी आज तडकाफडकी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मसाला मार्केटमधील वाढीव चटईक्षेत्र प्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2क्13मध्ये संपली आहे. दोन वेळा या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु मागील काही दिवसांपासून पणन संचालक सुभाष माने यांनी  येथील कारभाराविषयी चौकशी सुरू केली होती. एफएसआय प्रकरणी गुन्हे दाखल करण्याविषयी नोटीसही दिली होती. आज दुपारी 2 वाजता अचानक  पणन संचालकांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून तो बाजार समिती प्रशासनास कळविला आहे. प्रशासक म्हणून निवृत्त उपनिबंधक अशोक भांडबळकर व बाजार समितीचे निवृत्त सहसचिव आर. आर. कळमकर यांचे सदस्यमंडळ नियुक्त केले. 
पणन संचालकांनी ठाणो जिल्हा उपनिबंधकांना पत्र देवून एफएसआय घोटाळाप्रकरणी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   बाजार समिती सचिव सुधीर तुंगार, सभापती बाळासाहेब सोळसकर यांनी या निर्णयाविरोधात शासनाकडे धाव घेतली असून तशी कार्यवाही सुरू केली  आहे. 
 नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून एफएसआय प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा उपनिबंधकांना सूचना दिल्या असल्याचे पणन संचालक सुभाष माने यांनी सांगितले.