मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी संकेतस्थळासह अ‍ॅपचा पर्यायही खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:54 AM2020-03-02T00:54:44+5:302020-03-02T00:54:51+5:30

महापालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कर भरण्यासाठी महापालिकेने सविस्तर टप्पे नमूद केले

The app also opens with a website for Mumbaiites to pay property taxes | मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी संकेतस्थळासह अ‍ॅपचा पर्यायही खुला

मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी संकेतस्थळासह अ‍ॅपचा पर्यायही खुला

Next

मुंबई : महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या करांचा भरणा वेळेत करावा, यासाठी महापालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कर भरण्यासाठी महापालिकेने सविस्तर टप्पे नमूद केले असून, दिलेल्या मुदतीमध्ये कर भरण्याची विनंती केली आहे. विशेषत: संकेतस्थळासह अ‍ॅपद्वारेही आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो.
मालमत्ता करवसुलीच्या टप्प्यांनुसार, महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ताधारक ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. यामध्ये सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास डिमांड लेटर पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ताधारकास दिली जाते.
त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग सील करण्याची कारवाई; त्यानंतर मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई यापूर्वी केली जात असे. आता दुचाकी, चारचाकी वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या बाबी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानुसार, या वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसांत न झाल्यास, सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करून त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाणार आहे.
>असे आहेत अन्य पर्याय
मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात मालमत्ता करांचा भरणा रोख रकमेच्या स्वरूपात करता येतो.
नागरिक सुविधा केंद्रात डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा पीओएसच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर डावीकडे मालमत्ता कर असा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खुल्या होत असलेल्या पानावर मालमत्ता खाते क्रमांक नमूद करून, संबंधित मालमत्तेवरील करांचा भरणा करता येऊ शकतो.
संकेतस्थळासह अ‍ॅपद्वारेही आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो.

Web Title: The app also opens with a website for Mumbaiites to pay property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.