‘अॅप बेस’ बस लवकरच
By Admin | Published: June 22, 2017 04:56 AM2017-06-22T04:56:02+5:302017-06-22T04:56:02+5:30
अॅप बेस टॅक्सी सेवा पुरवणारी ओला कंपनी मुंबईकरांसाठी वातानुकूलित बस सेवा सुरू करणार आहे. या बसचे बुकिंगही अॅपच्या माध्यमाने करता येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अॅप बेस टॅक्सी सेवा पुरवणारी ओला कंपनी मुंबईकरांसाठी वातानुकूलित बस सेवा सुरू करणार आहे. या बसचे बुकिंगही अॅपच्या माध्यमाने करता येणार आहे. एकीकडे शहरात ‘बेस्ट’ आणि राज्यात ‘एसटी’ आर्थिकदृष्ट्या गर्तेत सापडल्याने ओला एसी बसला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या शहरात मेट्रो प्रकल्पांची कामे वेगात सुरूआहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे ओला कंपनीने अॅप बेस बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बस रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. ओला बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मोफत वाय-फाय सेवादेखील पुरवण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यासाठी ४९ रुपये आणि त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी ४ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर गाडीतील आसनही मोबाइलवरून बूक करता येणार आहे.
शहरातील गर्दीच्या वेळी (पिक अवर) ही बस सेवा धावणार आहे. भार्इंदर ते पवई, ठाणे, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर ही बस सेवा देण्यात येणार आहे. ठाणे-पवई, अंधेरी-वांद्रे कुर्ला संकुल या मार्गावर ही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ओला च्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत बेस्ट डबघाईला आली आहे. शिवाय राज्यात एसटी बससेवेवरदेखील कोट्यवधींचे कर्ज आहे. त्या धर्तीवर शहरातील ओला बससेवेला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थळभाडे प्रवास वेळ
(")
भार्इंदर-पवई ५९सकाळी ७.३०
भार्इंदर-ठाणे ५९सकाळी ७.२०
भार्इंदर-अंधेरी ४९सकाळी ७.४५
भार्इंदर-बीकेसी ७५सकाळी ७.३०
अंधेरी-बीकेसी ४९ सकाळी ८.४५
पवई-ठाणे ४९ सकाळी ९.००
बीकेसी-अंधेरी ४९ सायं. ५.३०
ठाणे-पवई५९ सायं. ८.३०