Join us

गणेशोत्सव मंडळांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अशा वेळेस मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचादेखील मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत ...

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अशा वेळेस मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचादेखील मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. राज्यात केवळ सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. हेच लक्षात घेता बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. मागीलवर्षी मुंबईमध्ये गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळात ४५० जणांची टीम तयार करून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी मंडळांनी सहकार्यदेखील केले. रविवारी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडे पुन्हा मदतीचा हात मागितल्याने सर्व गणेशोत्सव मंडळांना समन्वय समितीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.