मुंबई : राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत, अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. नोंदणी २७ एप्रिल, २०३६ पर्यंत करता येईल. नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे, तेथेच संपर्क साधावा लागेल.
................................................................
आशा स्वयंसेविकांनी दिला संपाचा इशारा
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या १५ जूनपूर्वी मान्य कराव्यात, अशी मागणी राज्य शासनाकडे राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने केली. मागण्या मान्य न झाल्यास, १५ जूनला राज्यव्यापी लाक्षणिक संप व त्यानंतर कोरोनाविषयक कामावर बहिष्कार टाकू, असा इशारा कृती समितीचे एम.ए. पाटील यांनी दिला. राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७२ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.
.............................................