सौरऊर्जानिर्मितीसाठी मुंबईकरांना आवाहन

By admin | Published: March 28, 2016 02:08 AM2016-03-28T02:08:26+5:302016-03-28T02:08:26+5:30

एक मेगावॅटपेक्षा कमी मागणी असलेल्या वीजग्राहकांनी त्यांच्या घराच्या छपरावर/गच्चीवर सौर फोटो व्होल्टॅक यंत्रणा बसवून सौरऊर्जानिर्मिती केली तर त्याद्वारे त्यांचा वीजवापर कमी

Appeal to Mumbai for solar power generation | सौरऊर्जानिर्मितीसाठी मुंबईकरांना आवाहन

सौरऊर्जानिर्मितीसाठी मुंबईकरांना आवाहन

Next

मुंबई : एक मेगावॅटपेक्षा कमी मागणी असलेल्या वीजग्राहकांनी त्यांच्या घराच्या छपरावर/गच्चीवर सौर फोटो व्होल्टॅक यंत्रणा बसवून सौरऊर्जानिर्मिती केली तर त्याद्वारे त्यांचा वीजवापर कमी होत असल्याने वीज बिलात घट होईल. परिणामी, वीज ग्राहकांनी आपल्या प्रभागाशी संलग्न असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या ग्राहक सेवा विभागात सौरऊर्जानिर्मितीसाठी उपलब्ध असलेला नोंदणी अर्ज भरून सादर करावा, असे आवाहन बेस्टने केले आहे.
ग्राहकाने सौरऊर्जेद्वारे निर्माण केलेली युनिट्स ग्राहकाच्या खात्यात जमा केली जातील. ग्राहकाने जर त्याच्या वापरापेक्षा अधिक सौरऊर्जा युनिट्सची निर्मिती केली असेल तर ते युनिट्स वीज ग्राहकाच्या पुढील बिलात समायोजित केले जातील. परिणामी, सौरऊर्जानिर्मितीचा वीज ग्राहकांना फायदाच होईल. दरम्यान, सौरऊर्जानिर्मितीसाठीचा नोंदणी अर्ज बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही बेस्टकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to Mumbai for solar power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.