Join us

बत्ती बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:06 AM

मुंबई : पर्यावरण संवर्धन उपक्रमासाठी २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता जगभरात अर्थ अवर पाळला जाणार असून, मुंबईकर वीज ...

मुंबई : पर्यावरण संवर्धन उपक्रमासाठी २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता जगभरात अर्थ अवर पाळला जाणार असून, मुंबईकर वीज ग्राहकांनीदेखील या बत्ती बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने पयार्वरणाच्या संवधर्नासाठी आपल्या ३० लाख ग्राहकांसह सर्व भागधारकांना २७ मार्च रोजीच्या अर्थ अवरमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यासाठी आपल्या घरांतील व आस्थापनांतील वीजवापर रात्री ८.३० ते ९.३० या काळात स्वेच्छेने बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पृथ्वीचे सरासरी तापमान १९ शतकाच्या अखेरीपासून १.२० सेल्सिअसने वाढले आहे. जागतिक मेट्रोलॉजिकल संस्थेच्या संकेतस्थळावरून जानेवारी २०२१ अमेरिका, पॅरिसमधील हवामानावरील संयुक्त कराराची ताजी आकडेवारी आणि १७५० सालाशी म्हणजेच औद्योकीकरणपूर्व काळाशी तुलना करता तापमान १.३० सेल्सिअसने वाढले आहे. कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सजर्नात झालेल्या वाढीमुळे हा बदल झाला आहे. शिवाय उष्ण वर्षे वाढत आहेत. ही तापमानवाढ सुरूच असून भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागितक हवामानशास्त्र संस्थेने दिला आहे. परिणामी तापमान वाढ कमी करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून अर्थ अवर पाळला जात आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून १८० राष्ट्रे व प्रदेश एकत्र येऊन या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. स्वेच्छेने वीजवापर बंद ठेवण्याच्या या उपक्रमात सहभाग घेत आहेत.