अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:47+5:302021-06-25T04:06:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य ...

Appeal to send objections regarding unclassified forts tourism scheme | अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन

अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करून देण्यासाठी ‘किल्ले पर्यटन योजना’ आखण्यात आली आहे. या योजनेबाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.

योजनेचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर ८ जुलैपर्यंत पाठवायच्या आहेत. राज्यात ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत. यापैकी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत ४७ तर राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत ५१ किल्ले असून, हे वर्गीकृत किल्ले आहेत. याशिवाय ३३७ अवर्गीकृत किल्ले आहेत. हे अवर्गीकृत किल्ले महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत किंवा खाजगी मालकीचे आहेत. यापैकी खाजगी मालकीचे किल्ले वगळून उर्वरित अवर्गीकृत (महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या) किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करून देण्यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे.

या योजनेतून किल्ल्यावर तसेच परिसरात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, अनुभवजन्य पर्यटन, किल्ले पर्यटन योजनेची अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे प्रचलन, प्रचलनासाठी निवड होणाऱ्या संस्थेची कामे, निधी उपलब्धता, प्रचलनासाठी आर्थित स्रोत, योजना राबविण्यासाठी किल्ल्यांची निवड करण्याकरिता समित्या, समित्यांच्या कार्यकक्षा आदी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Web Title: Appeal to send objections regarding unclassified forts tourism scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.