विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:20+5:302021-09-19T04:07:20+5:30

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी ...

Appeal for Special Pride Award | विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

विशेष गौरव पुरस्काराबाबत आवाहन

Next

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी. आयआयटी, आयआयएम, एम्स, अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल, तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी मिळविणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल, अशा स्वरूपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

नामांकने पाठविण्याचे आवाहन

मुंबई : देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी नि:स्वार्थ भावनेने अथक कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने नामांकने पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि. मोरये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. व्यक्ती अथवा संस्थाांनी आपल्या कार्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग ३१ ब यांच्याकडे पाठवावयाची आहे. या पुरस्कारासाठी कोणीही भारतीय नागरिक वा भारतातील संस्था किंवा संघटना व्यक्ती अथवा संस्थेचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारासाठी नागरिकांनी नामांकने पाठवावीत, असे आवाहनही मोरये यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: Appeal for Special Pride Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.