स्टँडअप इंडिया योजनेबाबत आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:29+5:302021-06-20T04:06:29+5:30
मुंबई - केंद्र शासनाने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील ...
मुंबई - केंद्र शासनाने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय अन्वये योजनेच्या अटी व शर्ती, तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सूची जाहीर केलेली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने १० टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर १५ टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.
गरजूंसाठी अन्नदान
मुंबई – वैंदू समाजाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी बजाज इलेक्ट्रॅानिक्स आणि रोटरी क्लब ऑफ बॅाम्बे यांच्या माध्यमातून नुकतेच अन्नदान करण्यात आले. यामुळे जोगेश्वरी, मरोळ, साकीनाका आणि मालाड येथील वैदू समाजातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून रोज अन्नदानाचे वाटप केले जात आहे.