मुंबई : ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना मदत करणे या हेतूने केंद्र सरकारने गुणवंत खेळाडू पेन्शन योजना सुरू केली आहे. पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करायचा आहे.
मोफत वेबिनारचे आयोजन
मुंबई : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजता उद्योजकता परिचय कार्यक्रमाबाबत मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी https://bit.ly/3tjXaYK ही लिंक आहे. सिस्को वेबेक्स (Cisco Webex) या माध्यमाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
विवेकानंदांच्या कार्यावर ऑनलाइन व्याख्यान
मुंबई : विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर धनश्री लेले यांचे व्याख्यान २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे यूट्युबवरून प्रसारित करण्यात येईल. कार्यक्रमाची लिंक २६ तारखेला dadarmatungaculturalcentre.org या केंद्राच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल.