Join us

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महिला गौरव पुरस्कारासाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 21:00 IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महिला गौरव पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आहे.

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महिला गौरव पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आहे. सन २०२० या वर्षासाठी साहित्य क्षेत्रातील कोणत्याही भाषेतील साहित्यकृतींचा उत्तम अनुवाद मराठी भाषेत करणाऱ्या महिलेला हा पुरस्कार दिला जाणार असून रोख रक्कम १० हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी महिलांची नांवे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी तसेच पुरस्कार नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ या पत्त्यावर किंवा २२०४५४६०, २२०२८५९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नांवे व माहिती पाठविण्याची अंतिम तारीख २६ जानेवारी २०२० आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सरचिटणीस श. गं. काळे यांनी दिली आहे.

टॅग्स :यशवंतराव चव्हाणमहिलामहाराष्ट्रमुंबई