Join us

दहिसरच्या विठ्ठल मंदिर चौकाचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

मुंबई : दहिसर पश्चिम येथील प्रसिद्ध आणि पुरातन विठ्ठल मंदिराच्या चौकाला नवा लुक आला आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ...

मुंबई : दहिसर पश्चिम येथील प्रसिद्ध आणि पुरातन विठ्ठल मंदिराच्या चौकाला नवा लुक आला आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दहिसरचे भूषण असलेल्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील पुरातन विठ्ठल मंदिराच्या चौकाच्या नूतनीकरणाचे उद‌्घाटन कोविडच्या नियमांचे पालन करून शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग क्रमांक सातच्या स्थानिक नगरसेविका व शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी येथील विठ्ठल मंदिराच्या चौकाचे सुशोभीकरण केल्याने आणि येथे वरीची प्रतिकृती साकारल्याने या परिसराचे रुपडे पालटले आहे. यावेळी महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, विधानसभा समन्वयक किशोर म्हात्रे, विधानसभा संघटक अविनाश लाड, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, विधानसभा संघटक गौरी खानविलकर, शाखासंघटक दीपा चुरी, भावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सहयोग ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अजित मांजरेकर आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.