पाडव्याला घर घेताना जपून, आॅफर्सला न भुलण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:20 AM2018-03-16T02:20:31+5:302018-03-16T02:20:31+5:30
हिंदू नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली जाते. घर खरेदीसाठी विविध विकासकांकडून आॅफर्सचा भडिमार सुरू आहे.
चेतन ननावरे
मुंबई : हिंदू नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली जाते. घर खरेदीसाठी विविध विकासकांकडून आॅफर्सचा भडिमार सुरू आहे. मात्र या आॅफर्सच्या आडून तुमची फसवणूक तर होत नाही ना? याकडे लक्ष देऊन ग्राहकांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचे आवाहन विकासकांच्या नरेडको या संघटनेने केले आहे.
नरेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी म्हणाले की, मुंबईत घर खरेदी हा एक व्यवहार नसून ते बहुतेकांचे स्वप्न असते. गेल्या काही काळापासून मंदावलेला रिअल इस्टेटचा व्यवसाय या मुहूर्तानंतर उभारी घेण्याची दाट शक्यता आहे. समाजातील सर्व घ्
ाटकांसाठी सध्या घर खरेदीसाठी योग्य वातावरण आहे. घटलेला व्याजदर, सरकारी अनुदान, घरांची उपलब्धता अशा सर्व बाजूंनी घर खरेदीचा योग जुळून आला आहे. त्याचा पूरेपूर फायदा ग्राहक या मुहूर्तावर घेताना दिसतील.
जुळून आलेल्या संधीचा गैरफायदा विकासकांकडून घेण्याची शक्यताही बड्या विकासक आणि कंपन्यांनी व्यक्त केली आहे. विशेषत: घर खरेदीवर स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीतून सूट दिल्याच्या आॅफर्स विकासकांकडून दिल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या एकूण रकमेतील नफ्यात वाढ करून विकासकांकडून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय कोणताही व्यवहार करण्याची घाई करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
>बुकिंगची घाई करू नका!
चांगल्या मुहूर्ताचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट कंपन्या उघडून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीही याआधी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बुकिंगची घाई न करता, संपूर्ण कागदपत्रांची खातरजमा करावी. तसेच तज्ज्ञ आणि वकिलांचा सल्ला घेतल्याशिवाय आगाऊ रक्कम देण्याची घाई करू नये, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
>माहिती घेऊनच व्यवहार करा!
रिअल इस्टेटमध्ये गुढीपाडव्याला वर्षातील सर्वाधिक घर खरेदी नोंदवली जाते. त्यामुळेच ग्राहकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यासाठी विकासक जाहिरातीवर अधिक भर देतात. मात्र आम्ही मीरा रोड येथे सर्वात उंच गुढी उभारून हा सण साजरा करणार आहोत. आॅफर्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाºयांवर महारेराची नजर आहे. ग्राहकांनीही कोणत्याही आमिषाला बळी न पडता, घर खरेदी करताना संपूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करावा. काही संशय वाटल्यास त्यांच्याकडे महारेराचा पर्याय
आहेच.
- शुभम जैन, विकासक
>घर खरेदी २० टक्क्यांनी वाढेल!
यंदाच्या गुढीपाडव्याला घर खरेदीमध्ये २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वाटते. विविध आॅफर्समुळे विकासकांमध्ये तोडीस तोड स्पर्धा आहे. मात्र प्रत्येक जण हटके आॅफर्स देत आहेत. त्यात घर खरेदीवर काही तरी मोफत देऊन ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा ग्राहकांना घर
खरेदी करण्यात सवलत देणे अधिक गरजेचे आहे.
- संदीप जगासिया, विकासक