अकरावी आॅनलाइनचे अर्ज २८ मेपासून

By admin | Published: May 22, 2015 12:10 AM2015-05-22T00:10:16+5:302015-05-22T00:10:16+5:30

मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणारी अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाने घेतला आहे.

Application for 11th online from May 28 | अकरावी आॅनलाइनचे अर्ज २८ मेपासून

अकरावी आॅनलाइनचे अर्ज २८ मेपासून

Next

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणारी अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाने घेतला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा वैयक्तिक माहितीचा भाग विद्यार्थ्यांना २८ मेपासून भरता येणार आहे. प्रवेशाची माहिती पुस्तिका शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून २५ मे, सोमवारपासून शाळांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याची सूचना शासनाला केली होती. मात्र, मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने २0१५-१६ या शैक्षणिक वर्षाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया गतवर्षीप्रमाणेच होणार असल्याचे मुंबई विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रवेशाची माहिती पुस्तिका शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ६६६.ल्लिीिे४ेुं्र.ङ्म१ॅ व ँ३३स्र://ा८्नू.ङ्म१ॅ.्रल्ल/े४ेुं्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर लॉगइन आयडी, पासवर्ड व महाविद्यालयाच्या कोडसह नमुना प्रवेश अर्ज असणारी अकरावीची माहिती पुस्तिकेची छापील प्रत १५0 रुपये देऊन आपआपल्या शाळेतून व एमएमआर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावरून मिळवता येणार आहे. तसेच माहिती पुस्तिेकेच्या प्रती सर्व माध्यमिक शाळांना २५ मेपासून पाठविण्यात येणार असून २७ मेपर्यंत सर्व शाळांना मिळतील. एमकेसीएलची लिंक २८ मेपासून सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल लागेपर्यंत पसंतीक्रम भरण्याचा सराव करता येईल, असे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक भि.दि. फडतरे यांनी सांगितले.
अकरावीचा प्रवेश अर्ज दोन भागांमध्ये विभागला असून पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीचा अर्ज शाळेच्या मदतीने भरता येणार आहे. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Application for 11th online from May 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.