मुंबई: ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत आरोग्य परवान्यासाठी अर्जाची प्रक्रिया आता आॅनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या दिवसापासून किमान २० ते जास्तीत जास्त ३० दिवसांत आरोग्य परवाना मिळणे शक्य होणार आहे. आॅनलाइन प्रक्रियेत पाच वर्षांचे शुल्क आगाऊ भरण्याची सोय असल्याने परवान्याचे नूतनीकरण दरवर्षाऐवजी पाच वर्षांतून एकदाच करावे लागणार आहे. याचा मोठा दिलासा उपाहारगृहे, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते, लॉज, पिठाची गिरणी, तेल-तूप विक्रेते यासारख्या विविध ३५ व्यवसायांना मिळणार आहे.महापालिका अधिनियम कलम ३९४ अंतर्गत विविध ३५ व्यवसायांसाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा आरोग्य परवाना आवश्यक असतो. आतापर्यंत हा परवाना मिळण्यासाठी व्यावसायिकांना बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आॅनलाइन प्रक्रियेमुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. परंतु अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची हमी संबंधितांना द्यावी लागेल. याची तपासणी अग्निशमन दलामार्फत स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. आरोग्य, बांधकाम परवाना अशा विविध विभागांमार्फतही त्या-त्या नियमांवर अंमल होत असल्याची खातरजमा करण्यात येणार आहे.व्यावसायिकाने अर्ज भरून आॅनलाइन पद्धतीनेच ‘सबमिट’ केल्यानंतर या अर्जाचा क्रमांक स्वयंचलित पद्धतीने संबंधित विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे अर्ज पाठविला जाईल. या पद्धतीने केलेल्या आॅनलाइन अर्जाची मुदत जास्तीत जास्त कार्यालयीन कामकाजाच्या ३० दिवसांची आहे. या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ही अर्ज प्रक्रिया आपोआप रद्द होईल. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अर्जदारास पुन्हा नवीन अर्ज करावा लागणार आहे.इमारतीची होणार कसून तपासणीव्यवसायाला परवाना मिळाल्यानंतर व्यवसाय थाटण्यात आलेल्या इमारतीत बेकायदा बांधकाम, धोकादायक परिस्थिती आदी समस्या समोर येते. त्यामुळे इमारत व कारखाने खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत या इमारतीची तपासणी करण्यात येईल. यामध्ये संबंधित इमारतीवर काही कारवाई प्रलंबित आहे का? महापालिकेच्या अभिलेखांनुसार सदर इमारत धोकादायक परिस्थितीत आहे का? तसेच ती जागा व्यावसायिक आहे का? या तीन बाबींची खातरजमा करण्यात येणार आहे.कार्यालयीन कामकाजाच्या १० दिवसांच्या आत त्यांचे शेरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे. मात्र इमारत व कारखाने खात्याने शेरे न दिल्यास आरोग्य परवाना देण्यास त्यांचा आक्षेप नसल्याचे गृहीत धरून परवाना देण्याची कार्यवाही केली जाईल. याबाबतची जबाबदारी इमारत व कारखाने खात्याची असेल.अग्निसुरक्षेची होणार खातरजमाआस्थापनेच्या प्रस्तावित जागेची अग्निसुरक्षाविषयक तपासणी ‘फायर कम्प्लायन्स आॅफिसर’ यांच्याद्वारे केली जाईल. या अंतर्गत अर्जदाराने अर्ज करताना अग्निसुरक्षाविषयक जी कागदपत्रे अपलोड केली आहे, त्यांची तपासणी करण्यात येईल. यात त्रुटी असल्यास त्याची माहिती अर्जदारास तीन कार्यालयीन दिवसांत ई-मेलद्वारे कळविणे अग्निसुरक्षा अधिकाºयास बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यापुढील सात कार्यालयीन दिवसांत ‘फायर कम्प्लायन्स आॅफिसर’ जागेची तपासणी करून आपला अहवाल देणार आहे. या जागेची आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही तपासणी होणार आहे. मात्र परवाना दिल्यानंतर कोणत्याही तपासणीदरम्यान सदर जागा अग्निसुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे आढळून आल्यास परवाना तत्काळ रद्द होईल.आॅनलाइनचा मिळणार परवानाया सर्व तपासणी झाल्यानंतर सदर अर्ज विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांकडून उपकार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यांनी त्यांच्या स्तरावर अर्जाची तपासणी केल्यानंतर व मान्य किंवा अमान्य केल्यास सदर अर्ज संबंधित साहाय्यक आयुक्तांच्या मंजुरीनंतर ही माहिती अर्जदारास ई-मेलद्वारे कळविले जाईल. अर्जदाराने आॅनलाइन शुल्क जमा केल्यानंतर महापालिकेचा आरोग्य परवाना आॅनलाइन पद्धतीनेच अर्जदारास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. या परवान्यावर संबंधित आरोग्य अधिकाºयांचे अधिकृत ‘डिजिटल सिग्नेचर’ असेल.येथे व असा करावा अर्जच्महापालिकेच्या स्रङ्म१३ं’.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल (६६६.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावरील आॅनलाइन सेवा (डा’्रल्ली री१५्रूी२) या लिंक अंतर्गत ठी६ इ४२्रल्ली२२ाी२२ अस्रस्र’्रूं३्रङ्मल्ल या दुव्यावर ‘क्लीक’ केल्यानंतर उघडणाºया पानावरच आॅनलाइन अर्ज असून तो आॅनलाइन पद्धतीनेच सादर करता येतो. ठी६ इ४२्रल्ली२२ाी२२ अस्रस्र’्रूं३्रङ्मल्ल अंतर्गत ऌीं’३ँ छ्रूील्लूी या पर्यायाची निवड अर्जदाराने करावी.च्अर्जदाराला त्याचे ‘पॅन कार्ड’ स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदाराने त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.च्हा अर्ज भरताना अर्जदारास आरोग्य परवान्याच्या संख्येनुसार प्रत्येक परवान्यासाठी दोनशे रुपये प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. यासाठी ‘आॅनलाइन पेमेंट’ सुविधादेखील उपलब्ध आहे.
आरोग्य परवान्यासाठी अर्ज आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:38 AM