एसव्हीकेएमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:05+5:302021-04-28T04:07:05+5:30

एसव्हीकेएमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस बलवंत शेठ स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसएसए), या शैक्षणिक संस्थेने ...

Application for postgraduate course of SVKM | एसव्हीकेएमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज

एसव्हीकेएमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज

Next

एसव्हीकेएमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस बलवंत शेठ स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसएसए), या शैक्षणिक संस्थेने मुंबईतील मास्टर ऑफ आर्किटेक्चर (एम. आर्च.) अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवले आहे. आर्किटेक्चर कौन्सिलने मंजूर केलेल्या या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक पारंपरिक स्थापत्य पद्धतींच्या सीमा विस्तृत करण्यासाठी नावीन्यपूर्ण डिझाइन तयार करणे आणि व्यावसायिक बनण्याची क्षमता विकसित करते. काळजीपूर्वक आखलेला हा अभ्यासक्रम शैक्षणिक आणि औद्योगिक ज्ञान एकत्रित करतो जिथे विद्यार्थ्यांना बहु-अनुशासनात्मक निवड आणि परस्परसंवादी सेमिनारद्वारे शिकवले जाते. आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम किंवा आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे मान्यता प्राप्त कोणत्याही इतर कोर्समध्ये अर्जदाराचे किमान ५० टक्के एकूण गुण असणे आवश्यक आहे. असून अर्ज करण्यासाठी, संभाव्य अर्जदार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत.

-----------

कोविड केअर सेंटरचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उदघाटन केले. भुराभाई आरोग्य भवन, येथे या कोविड सेंटरमध्ये ११७ ऑक्सिजन बेड्स असून, ते आता मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. या कोविड सेंटरला पॅथॉलॉजी आणि डिजिटल एक्सरे सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उदघाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, अतुल भातखळकर, भाई गिरकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Application for postgraduate course of SVKM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.