Join us

अध्यक्षपद निवडणुकीसाठी अर्ज दाखल

By admin | Published: April 05, 2015 1:54 AM

मुंबई महानगरपालिकेच्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपा-रिपाइं (आठवले गट) महायुतीतर्फे यशोधर फणसे यांनी अर्ज दाखल केला.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ६ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपा-रिपाइं (आठवले गट) महायुतीतर्फे यशोधर फणसे यांनी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे वकारुन्निसा अन्सारी तसेच शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप-सेना-रिपाइं (आठवले गट) महायुतीच्या रितू तावडे यांनी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे विन्नी डिसोझा यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज महापालिका चिटणीस कार्यालयात दाखल केला. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या सुधार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप-सेना-रिपाइं (आठवले गट) महायुतीतर्फे प्रकाश गंगाधरे यांनी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे डॉ. अंजता यादव यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज महापालिका चिटणीस कार्यालयात दाखल केला.