नवाब मलिक यांच्यावरील गुन्हा नोंदविण्याचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 10:09 IST2021-12-19T10:08:16+5:302021-12-19T10:09:18+5:30
भारतीय यांनी दाखल केलेल्या अन्य एका दाव्यात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

नवाब मलिक यांच्यावरील गुन्हा नोंदविण्याचा अर्ज फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनासंदर्भातील नियम न पाळल्याने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाने सोमवारी हा अर्ज फेटाळला.
भारतीय यांनी केलेल्या तक्रारीनुसार, भारतीय यांनी दाखल केलेल्या अन्य एका दाव्यात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. त्यावेळी मलिक न्यायालयात उपस्थित राहिलेही आणि न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या आवारातच मलिक यांचे समर्थक व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.