दहावीच्या निकालानंतर अर्ज नोंदणीला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:21+5:302021-07-16T04:06:21+5:30

मुंबई : सद्य:स्थितीत तंत्रशिक्षण पदविकांसाठी राज्यात साधारणतः २२ हजारांपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी झाली झाली असून, दहावीच्या निकालानंतर तंत्रशिक्षण पदविकांच्या अर्ज ...

Application registration will get speed after 10th result | दहावीच्या निकालानंतर अर्ज नोंदणीला मिळणार गती

दहावीच्या निकालानंतर अर्ज नोंदणीला मिळणार गती

Next

मुंबई : सद्य:स्थितीत तंत्रशिक्षण पदविकांसाठी राज्यात साधारणतः २२ हजारांपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी झाली झाली असून, दहावीच्या निकालानंतर तंत्रशिक्षण पदविकांच्या अर्ज नोंदणीला अधिक वेग प्राप्त होईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांनी दिली. मागील वर्षी तंत्रशिक्षण प्रवेशांमध्ये एकूण १० टक्के प्रवेशाची वाढ नोंदविण्यात आली होती. सद्य:स्थितीतही विद्यार्थी हे तंत्रकुशल आणि कौशल्यपूर्ण अभ्यासाकडे वळत असल्याने तंत्रशिक्षण पदविका प्रवेशांसाठी चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी ३० जूनपासून सुरुवात झाली असून, २३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना या दरम्यान नोंदणीसह प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती ही स्कॅन करून अपलोड करता येणार आहेत. दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असल्याची माहिती वाघ यांच्याकडून देण्यात आली.

पदविका अभ्यासक्रमांची गरज, रोजगार आणि विविध कंपन्यामध्ये असलेली संधी अशा विविध बाबी ध्यानात घेऊन आता तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. यंदा ही संचलनालयाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असून, विद्यार्थ्यांची दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घाई होऊ नये यादृष्टीने प्रक्रिया ३० जूनला सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अनेक विद्यार्थ्यांकडे आपली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सद्य:स्थितीत सोबत नाहीत. अनेक विद्यार्थी अजूनही आपल्या मूळ गावी आहेत. त्यामुळेही विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आता पाहिल्यानंतर त्यासाठी अर्ज केल्याने अद्याप त्यांची प्रमाणपत्रे आलेली नाहीत अशी ही स्थिती समोर आली आहे.

शैक्षणिक वर्ष : २०१८- १९

कोर्स संस्था जागा प्रवेश रिक्‍त जागा

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम ४११ १२३५०९ ५१५५५ ७१९५४

थेट दुसऱ्या वर्षात अभियांत्रिकी प्रवेश ४१९ १०६७३५ ३५६६९ ७१०६६

शैक्षणिक वर्ष : २०१९ - २०

कोर्स संस्था जागा प्रवेश रिक्‍त जागा

दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम - ३७८ १०८०४१ ५५०२३ ५३०१८

थेट दुसऱ्या वर्षात अभियांत्रिकी प्रवेश - ३८७ ८२२७५ ३५५८१ ४६६९४

स्क्रुटीनी आवश्यक

या सर्व प्रवेशप्रक्रिया दरम्यान प्रत्यक्ष स्क्रुटीनी पद्धत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व निर्बंधांचे पालन करीत सुविधा केंद्रावर सुरक्षित अंतर पाळायचे आहे. शिवाय सुविधा केंद्रावर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. जर उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची ई स्क्रुटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी केली नाही तर अशा उमेदवारांची नवे प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात येणाऱ्या कॅप आणि नॉन कॅप राउंडच्या यादीमध्ये दिसणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी

प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी असे आवाहन राज्य तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Application registration will get speed after 10th result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.