Join us

बलात्काराचा आरोपी नितीन पांचाळचा पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:00 AM

विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने फरार असताना आपल्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्याचा प्रकार मालाड येथे घडला आहे.

मुंबई : विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने फरार असताना आपल्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केल्याचा प्रकार मालाड येथे घडला आहे. वास्तव्याच्या पडताळणीसाठी हा अर्ज दिंडोशी पोलीस ठाण्यात आला आहे.विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्रनगरात राहाणाºया नितीन पांचाळ याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.सहा वर्षांपूर्वी ओळख झालेल्या नितीन पांचाळ याने आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून आपल्याशी विवाह करण्याचे वचन दिले. त्यादरम्यान आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी आपला विश्वास संपादन करून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने आपण तीन टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने आपण विचारणा केली असता त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे मागितल्यानंतर पांचाळने मोबाइलमधील माझ्या नकळत काढलेले माझे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही फोटो त्याने आपल्या मोबाइलवरही पाठवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.२0 मे २0१७ रोजी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप अटक झालेली नाही. मात्र दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेंद्रनगरात राहणाºया आरोपीने आपल्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला असून, तो पडताळणीसाठी दिंडोशी पोलीस ठाण्यात आला आहे.नूतनीकरणासाठी केलेल्या अर्जात पांचाळ याने आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिली असल्याची आपली माहिती असून, याबाबत चौकशी करून सरकारची फसवणूक आणि दिशाभूल केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी केली आहे. सुरुवातीला पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र खासदार हुसेन दलवाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मोहन कृष्णन यांनी सांगितले.

टॅग्स :गुन्हेमुंबईपोलिस